Satara News : उंब्रज पोलिसांकडून ४.३३ लाखांचा दंड वसूल


कोरोना रोखण्यासाठी ऑलआऊट ऑपरेशनअंतर्गत केल्या १ हजार ६८० केसेस

Satara News : कोरोनाच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशनदरम्यान उंब्रज पोलीस स्टेशनने दि. ४ ते २२ मे अखेर लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंंघन केल्याप्रकरणी एकूण १६८० केसेस करुन ४ लाख ३३ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. 

दंडात्मक कारवाईमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर एकूण ३६७ केसेसमध्ये १ लाख १०० रूपये, सोशल डिस्टिन्सिंगचे पालन न केल्याबद्दलच्या एकूण २३ केसेसमध्ये १८ हजार रूपये (एकूण ४०१ वाहने डिटेन करुन ठेवली), विनाकारण फिरणारे २७५ लोकांवर कारवाई करुन १ लाख ३९ हजार ५०० रूपये, ई पास एकूण ८ लोकांवर कारवाई करुन ८ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. तसेच १६ आस्थापनांवर लॉकडाऊन उल्लंंघनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव, पाटील व उंब्रज पोलीस ठाण्याचे सर्व अंमलदार तसेच होमगार्ड यांनी केली.

... अन्यथा यापुढेही कडक कारवाई

पोलीस यंत्रणा गावागावामध्ये जावून पोलिसांच्या पीए सिस्टीमद्वारे नागरिकांना लॉकडाऊनचे पालन करण्याचे व कोरोना साखळी तोडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करीत आहे. तसेच गावातील कोरोना नियंत्रण समितीशी चर्चा करुन समित्यांनाही गावामध्ये कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी काम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वांनी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे. अन्यथा यापुढेही अशीच कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या