Satara News : पत्रकारांच्या प्रश्नांबाबत एकत्र बसून निर्णय घेऊ


सातारा येथे पत्रकारांच्या शिष्टमंडळाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

Satara News : पत्रकारांच्या प्रश्नांसंदर्भात महाविकास आघाडीतील आम्ही सर्व घटक एकत्र बसून निर्णय घेऊ, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सातारा येथे बोलताना दिली.

जिल्ह्यातील कोरोना संकटाचा आढावा घेण्यासाठी अजितदादा शुक्रवारी सातारा येथे आले होते. रात्री १०.१५ वाजता त्यांची पत्रकार परिषद सुरू झाली. तत्पूर्वी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनी त्यांची भेट घेऊन पत्रकार बांधवांच्या प्रश्नांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. कोरोनामुळे राज्यातील सुमारे १४० पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यातही ७ पत्रकारांचे बळी गेले आहेत. राज्यातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा न मिळाल्याने त्यांच्या लसीकरणामध्ये अडथळे येत आहेत. देशातील १२ राज्यांनी पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून जाहीर करुन त्या अंतर्गत मिळणाऱ्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांची अनेक कुटुंबे बाधित आहेत, असे त्यांनी अजित पवार यांना अवगत केले. 

लसीकरणाबाबत राज्यभरातून निवेदने 

राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आमची आपणाला विनंती आहे, की आपण महाराष्ट्रातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्यावा, त्यांचे सरसकट लसीकरण करण्यास मान्यता द्यावी, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना सरकार मदत करावी, माध्यमांमधील सर्व घटकांना तातडीने बेड उपलब्ध करण्याबाबत आरोग्य विभागाला सूचना द्याव्यात, मृत झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबांना तत्काळ मदत करावी, वृत्तपत्र व मीडियामधील सर्व घटकांचे तातडीने लसीकरण करावे, बाधित पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ बेड मिळावेत या आमच्या मागण्या आहेत. त्यावर आधी बोला, नंतर पत्रकार परिषद सुरू करा अशी मागणी पाटणे यांनी केली. मार्फत

पत्रकारांच्या लसीकरणाबाबत राज्यात पत्रकारांची निवेदने आली आहेत. मंत्र्यांनीही ती पाठवली आहेत. पत्रकार व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींसाठी आपण केलेल्या मागण्यांबाबत आम्ही सगळे एकत्र बसून निर्णय घेऊ, असे अभिवचन अजित पवार यांनी यावर बोलताना दिले.

१२ राज्यांनी दिलाय फ्रंटलाईन वर्करचा दर्जा 

पत्रकार परिषदेत फ्रंटलाईन वर्कर दर्जाबाबत अजित पवार यांनी साशंकता व्यक्त केल्यानंतर हरीष पाटणे, विनोद कुलकर्णी, सुजित आंबेकर, तुषार तपासे, ओंकार कदम, सनी शिंदे या शिष्टमंडळाने व्यासपीठावर जावून निवेदन देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. १२ राज्यांनी असा दर्जा दिल्याचे अजितदादा यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावर त्यांनी असे असेल तर लगेच माहिती घेतो. आपणही राज्याचे १ शिष्टमंडळ मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवावे, मीही त्यांना सांगेन अशी ग्वाही त्यांनी दिली.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या