अॅक्टिव्ह रूग्णसंख्या घटत असली तरी म्युकर मायकोसिसमुळे धास्ती
Satara News : सातारा जिल्ह्यात या आठवड्यात रिकव्हरी रेट चांगला असल्याने रोज मोठ्या संख्येने कोरोनारूग्ण बरे होत आहेत. आजही दिवसभरात विविध रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या ३१२४ नागरिकांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
मागील चोवीस तासात जिल्ह्यामध्ये १८७५ रूग्णांची वाढ झाली आहे. त्यापेक्षा डिस्चार्ज देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या मोठी असल्यामुळे लोक सुटकेचा निश्वास सोडत आहेत. दररोज पॉझिटिव्ह येत असलेल्या रूग्णांच्या संख्येत चढउतार असल्याने टांगती तलवार कायम आहे. त्याचवेळी म्युकर मायकोसिस या नव्या आजाराचे संकट घोंगावत असल्याने मनातील भीतीही कमी व्हायचे नाव घेत नाही. जिल्ह्यात या आजाराचे २३ रूग्ण आढळले असून त्यांच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला लागला आहे.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - ६६४९९३ङ
- एकूण बाधित - १४४८४३
- घरी सोडण्यात आलेले - १२३७७०
- मृत्यू - ३३५९
- उपचारार्थ रुग्ण - १७७१०
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या