कोरोना वॉर्डमध्ये चार दिवसांपासून पाण्याचे दुर्भिक्ष्य; स्वच्छतेअभावी आरोग्य धोक्यात
Satara News : सातारा जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये गेल्या चार दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने रुग्णांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. स्वच्छतागृहात देखील घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रुग्णालय प्रशासनाकडून पिण्यासाठी आणि वापरासाठी नियमित पाणी पुरवठा केला जात नसल्याचा आरोप रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांनी माध्यमांकडे केला आहे.
सध्या या रूग्णांना बाहेरून नातेवाईकांकडून पिण्यासाठी पाणी मिळत आहे. रूग्णालय प्रशासनाने नियमितपणे पाणी पुरवठा करावा अशी मागणी रुग्णांनी केली आहे. दरम्यान, पाणी सोडण्यामध्ये कमीजास्त होत असल्यामुळे ही समस्या उद्भवली असून लवकरच पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिले आहे.
सीएसना नक्की कशात स्वारस्य ?
विविध सरकारी कार्यालयांमध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता याबाबतीत अनास्था दिसून येते. मात्र रूग्णालयात या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष दिले गेले पाहिजे. कारण त्याअभावी अनारोग्याला निमंत्रण मिळत असते. तथापि, जिल्हा शल्य चिकित्सकांचा कारभार हा अलीकडच्या काही वर्षात संशोधनाचा विषय झाला आहे. त्यांना स्वच्छता व पाणीपुरवठा या महत्त्वाच्या बाबींऐवजी नक्की कशात स्वारस्य असते याची चौकशी होणे गरजेचे आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या