रेमडेसिवीर इंजेक्शन ३५ हजाराला विकणाऱ्या वॉर्ड बॉयला रंगेहात पकडले
Satara News : सातारा जिल्हा प्रशासन रोजच्या रोज रुग्णालयांच्या मागणीनुसार ३५ टक्के रेमडेसिवीर पुरवठा करत आहे. फलटण येथील सुविधा हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय रेमडेसिवीरचा काळाबाजार करत असल्याचे समजताच अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक अरुण गोडसे यांनी वॉर्ड बॉयला रंगेहात पकडले.
हा वॉर्ड बॉय रेमडेसिवीरचे एक इंजेक्शन ३५ हजार रुपयांना विकत असल्याचे निदर्शनास आले आहे. या वॉर्ड बॉयला अटक करण्यात आली असून पोलीस विभाग पुढील तपास करीत आहे. यापुढे असा कोणी रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार करीत असल्याचे आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या