मात्र मृत्यूदर अद्याप चिंताजनकच; चोवीस तासात आणखी ४५ बाधितांचा मृत्यू
Satara News : सातारा जिल्ह्यात आजच्या आकडेवारीत नवीन बाधितांच्या संख्येत घट आल्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. रोज दोन हजारांच्या वर झेपावणारी नवीन रूग्णांची संख्या मागील चोवीस तासात १६२१ पर्यंत खाली आली आहे. त्याचबरोबर ४५ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ८० (६०६४), कराड २५० (१८५७९), खंडाळा ८२ (७८०५), खटाव १७२ (१११०३), कोरेगाव ७८ (१०७५७), माण २३४ (८५१४), महाबळेश्वर २३ (३५६८), पाटण ९६ (५१९७), फलटण २०६ (१६८६३), सातारा २८७ (२८५९२), वाई ९२ (९४३६) व इतर २१ (७१८) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख २७ हजार १९६ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली २ (१२९), कराड ६ (५११), खंडाळा २ (१००), खटाव ३ (३०३), कोरेगाव ३ (२६६), माण २ (१६५), महाबळेश्वर १ (३९), पाटण १ (१३०), फलटण ८ (२१८), सातारा ११ (८५७), वाई ६ (२४४) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण २९६२ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या