पाच लाख रूपयांपर्यंतच्या ठेवी परत करण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू
Satara News : अवसायनात निघालेल्या दि कराड जनता सहकारी बँकेच्या हजारो ठेवीदारांसाठी गुड न्यूज आहे. विहीत नमुन्यात व आवश्यक कागदपत्रांसह क्लेमफॉर्म सादर केलेल्या ठेवीदारांना त्यांच्या ५ लाख रुपये पर्यंतच्या ठेवींना डीआयसीजीसीने विमा क्लेम रक्कम मंजूर केली आहे. पहिल्या टप्यात ३९ हजार ३२ ठेवीदारांना ३२९ कोटी ७६ लाख रुपये मंजूर झाले आहेत. ही रक्कम त्यांच्या अन्य बँकेतील खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया बुधवार दि. ५ मे पासून सुरु होत असल्याची माहिती बँकेचे अवसायक तथा कराडचे उपनिबंधक (सहकारी संस्था) मनोहर माळी यांनी दिली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि शासनाचे निर्बंध याचा विचार करता कोणत्याही परिस्थितीत ठेवीदारांनी शाखांमध्ये गर्दी करु नये. मंजूर यादीप्रमाणे ज्यांना शाखेमार्फत सूचना येईल त्यांनीच दिलेल्या वेळेत मूळ कागदपत्रांसह संबंधित शाखेत संपर्क करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
ठेवीदारांची दीर्घकालीन प्रतीक्षा संपली
कराड जनता बँक ७ डिसेंबर रोजी अवसायनात निघाली होती. त्यामुळे या बँकेत ठेवी अडकून पडलेल्या हजारो ठेवीदारांचा जीव टांगणीला लागला होता. आता ठेवीदारांची दीर्घकालीन प्रतीक्षा संपली असली तरी मंजूर रक्कम त्यांना त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी बँकेला डीआयसीजीसीने किमान तीन महिन्यांचा कालावधी दिलेला आहे. कोविड परिस्थितीमुळे हा कालावधी वाढूही शकतो. त्यामुळे ठेवीदारांनी कोणत्याही प्रकारे घाईगडबड करण्याची गरज नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
शाखेत बोलवणे आल्यानंतर मूळ आधारकार्ड व पॅनकार्ड सोबत घेऊन आपल्या मूळ ठेव पावत्या आणि पासबुक जमा करुन त्याची पोहोच घ्यावी. कराड जनता बँकेत त्याची पडताळणी करुन पुढील सात दिवसात संबंधित ठेवीदारांना त्यांनी कळविलेल्या अन्य बँकेतील खात्यात रकमा जमा देण्याबाबत डीआयसीजीच्या सूचनेनुसार बँक ऑफ बडोदाला यादी पाठविण्यात येईल. बँक ऑफ बडोदाच्या मुंबईमधील ताडदेव शाखेमार्फत कराड जनता बँकेने सादर केलेल्या यादीनुसार संबंधित ठेवीदारांच्या खात्यावर रकमा वर्ग होतील. त्या बँकेत कोविड परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अडचणी, स्टाफची समस्या यामुळे ठेवीदारानी त्यांच्या मूळ पावत्या जमा केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये रक्कम येण्यास साधारणपणे एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
प्रलंबित अर्जातील त्रुटी दूर करण्याचे काम सुरू
क्लेमफॉर्म जमा केलेल्या काही ठेवीदारांचे प्रस्ताव तांत्रिक अडचणींमुळे मंजूर झालेले नाहीत. त्यांना बँकेकडून संपर्वâ करुन आवश्यक त्रुटी दूर करण्याचे कामही सुरु करण्यात आले आहे. तर ज्या ठेवीदारांनी अद्यापपर्यंत क्लेमफॉर्म जमा केलेले नाहीत त्यांनी लवकरात लवकर नजीकच्या शाखेत आवश्यक कागदपत्रांसह ते जमा करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. क्लेमफॉर्म डीआयसीजीकडे पाठवून मंजूर झाल्याशिवाय कोणालाही ठेवरक्कम मिळणार नाही, असेही मनोहर माळी यांनी आवर्जून सांगितले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या