आरोग्य विभागाची धडक कारवाई; कोरोनासदृश लक्षणांच्या रूग्णांवर उपचार भोवले
Satara News : जिल्हा परिषदेची नोंदणी न करता दवाखाना चालवून कोविडसदृश सर्दी, ताप, खोकला इत्यादी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर परवानगी नसताना व आरोग्य विभागाला न कळवता परस्पर उपचार करणाऱ्या जावली तालुक्यातील मेढा येथील एका डॉक्टरच्या दवाखान्यावर आरोग्य विभागाने छापा टाकूून दवाखाना सील केला.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मेढ्यातील एक डॉक्टर जिल्हा परिषदेची परवानगी न घेता दवाखाना चालवत होता. कोरोना काळात जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून कोरोनासदृश लक्षणे सर्दी, ताप, खोकला असलेल्या रुग्णांवर आरोग्य विभागाला न कळवता उपचार करत होता. याबाबत आरोग्य विभाग, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार संबंधित डॉक्टरच्या दवाखान्यावर प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांनी छापा टाकूून डॉक्टरची चौकशी केली.
सगळ्याच बेकायदा गोष्टींचा ‘पंचनामा’
या चौकशीत या दवाखान्याने जिल्हा परिषदेची मान्यता घेतली नसून नोंदणी केली नसल्याचे आढळून आले आहे. तसेच बायोमेडिकल वेस्ट अॅक्टचे नोंदणी प्रमाणपत्र मुदतबाह्य असल्याचे आढळले. ओपीडी रजिस्टर उपलब्ध नाही. फायर ऑडिट प्रमाणपत्र नाही. तसेच या डॉक्टरची होमिओपॅथिची पदवी असताना दवाखान्यात अॅलोपॅथी औषधांचा साठा मोठ्या प्रमाणात आढळून आला. हा दवाखाना रहिवासी इमारतीत एका फ्लॅटमध्ये सुरू होता. इत्यादी बाबी या दवाखान्याचा पंचनामा करताना आढळून आल्याने केळघर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन गुंड यांनी पंचनामा करून दवाखाना सील केला आहे.
यापुढे तालुक्यातील इतर खाजगी डॉक्टरांच्या दवाखान्याची तपासणी करण्यात येणार आहे. यात दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे डॉ. नितीन गुंड यांनी सांगितले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या