सर्व ग्रामपंचायतींनी विलगीकरण कक्ष स्थापन करावा - पालकमंत्री
Satara News : मसूर (ता. कराड) येथे ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिमूर्ती मंगल कार्यालयात उभारण्यात आलेल्या विलगीकर कक्षाचा शुभारंभ राज्याचे सहकार व पणनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता साळुंखे (माई), लालासाहेब पाटील कवठेकर, प्रांताधिकारी उत्तम दिघे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, मसूरचे सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे, दिनकर शिरतोडे, प्रकाश माळी, प्रवीण लोकरे, विकास स्वामी, सनी रामुगडे, प्रकाश पाटील, विकास पाटील, सतीष कदम, डॉ. रमेश जाधव तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
गृह विलगीकरणामुळे रुग्णसंख्येत वाढ
गृह विलगीकरणामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे, नियमांचे पालन होत नाही, म्हणून प्रत्येक गावात विलगीकरण कक्ष स्थापन झाल्यास गावातील सर्व रुग्ण एका ठिकाणी थांबतील. त्यामुळे उपचार, सेवा देणे, त्यांच्यावर लक्ष ठेवणे सोयीचे होईल. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी विलगीकरण कक्ष स्थापन करावा. त्यासाठी महसूल, आरोग्य व पंचायत समितीच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल असे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील म्हणाले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या