Satara News : अजिंक्यताराच्या ‘विक्रमी’ गळीत हंगामाची सांगता


ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत ठेवण्यासाठी कटिबद्ध - शिवेंद्रसिंहराजे

शासन सूत्रानुसार ३०४३ एफआरपी

गळीत हंगाम नियोजनबध्द व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संचालक मंडळाने व कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी अत्यंत नियोजनबध्द कार्यक्रम आखून गळीत हंगाम यशस्वी केला आहे. शासन निर्धारित सूत्रानुसार ऊसाची एफआरपी प्रति मे.टन ३ हजार ४३ रूपये निघालेली आहे. यापैकी चालू गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला दर १० दिवसाच्या कालावधीचे प्रति मे.टन २६००/- रूपयेप्रमाणे पहिली उचल दिली असून दर १० दिवसाचे पेमेंट करणारा अजिंक्यतारा कारखाना हा राज्यात पहिलाच कारखाना आहे. 

- आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले

Satara News : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळाले पाहिजे. त्यांच्या ऊसाला उच्चतम दर मिळाला पाहिजे हे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न अजिंक्यतारा कारखान्याने सत्यात उतरवले आहे. कारखाना पूर्णपणे आर्थिक सक्षम असून ऊस उत्पादक सभासदांना केंद्रबिंदू मानून त्यांचे जीवनमान नेहमीच उंचावत ठेवण्यासाठी अजिंक्यतारा कारखाना कटिबद्ध आहे, असे अभिवचन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. 

शाहूनगर, शेंद्रे (ता. सातारा) येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या ३७ व्या गळीत हंगामाची सांगता कारखाना स्थळावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते अंतिम ५ साखर पोत्यांचे पूजन करून करण्यात आली. यावेळी कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, उपाध्यक्ष विश्वास शेडगे, कार्यकारी संचालक संजीव देसाई व कारखान्याचे खातेप्रमुख आदी मोजके मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शासनाच्या नियमानुसार सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आले.

साखर उतारा व गाळपात उच्चांक 

यंदाच्या २०२० - २१ च्या गळीत हंगामात १८३ दिवसांमध्ये सरासरी १६०.१८ टक्के गाळप क्षमतेचा वापर करून एकूण ७ लाख ३१ हजार ६७० मे.टन ऊसाचे गाळप होवून सरासरी १२.८२ टक्के साखर उताNयाने ८ लाख ७२ हजार ६६० क्विंटल साखर उत्पादित झाली व ऊसाचे सरासरी हेक्टरी उत्पादन १०० मे. टन निघालेले आहे. या हंगामात निघालेला सरासरी साखर उतारा जिल्ह्यात सर्वाधिक साखर उतारा आहे. तसेच या हंगामात झालेले गाळप कारखान्याच्या इतिहासातील सर्वाधिक व उच्चांकी गाळप आहे.

गळीत हंगाम उत्कृष्टरित्या व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व सभासद, बिगर सभासद, संचालक मंडळ, सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे फार मोठे योगदान असल्याचे सांगून आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

विस्तारीकरणामुळे इथेनॉल उत्पादनात वाढ 

या हंगामात कारखान्याकडील डिस्टीलरी, इथेनॉल प्रकल्प व को-जनरेशन प्रकल्प यशस्वीपणे चालले असून चालू सिझनमध्ये इथेनॉल प्रकल्पाचे प्रतिदिन ३० हजार लिटर्स क्षमतेवरून प्रतिदिन ४५ हजार लिटर्सप्रमाणे इथेनॉल प्लांटचे विस्तारीकरण केल्यामुळे डिस्टीलरीच्या उत्पादनात वाढ झाली असून आर्थिक उत्पन्नही वाढले आहे. साहजिकच याचा फायदा सभासदांना निश्चित होईल. या गाळप हंगामात बी हेवी मोलॅसेसपासून ३४ लाख ३२ हजार ७८९ लिटर्स इथेनॉलचे उत्पादन झालेले आहे व त्याच प्रमाणे अल्कोहोलचे २८ लाख ७३ हजार २१९ लिटर्सचे उत्पादन झाल्याची माहिती कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी यावेळी दिली.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या