व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर व बाय बायपॅप मशिन वितरित करण्याचा निर्णय
Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सातारा व्यतिरिक्त शासकीय किंवा खाजगी हॉस्पिटलशिवाय पर्याय राहत नाही. यामुळे रुग्णांची गैरसोय होवून आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. या बाबी विचारात घेवून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाने जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये व कोविड सेंटरसाठी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर व बाय बायपॅप मशिन वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पाश्र्वभूमीवर खटाव व माण तालुक्यासाठी २ व्हेंटिलेटरचे वितरण बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, संचालक अनिल देसाई व प्रदिप विधाते यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, बँकेने कोरोना पाश्र्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये व कोविड सेंटरला व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर व बाय बायपॅप मशिन उपलब्ध करुन देवून इतर सहकारी बँकांपुढे आदर्श निर्माण केला आहे. जिल्हा बँकेच्या वतीने कोरोना बाधित रुग्णांना मदतीचा हात मिळाला आहे. ही उपकरणे लाईफ केअर अॅण्ड सव्र्हिसेस (सातारा) या नामांकित कंपनीकडून खरेदी केलेली आहेत.
आवश्यक त्या ठिकाणी मदत
अनिल देसाई म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची जोपासना करणारी ही बँक असून बँकिंग कामकाजाबरोबरच सामाजिक बांधिलकी नेहमीच जपत असते. बँकेने खटाव व माण तालुक्यातील व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरची गरज विचारात घेवून आवश्यक त्या ठिकाणी ही उपकरणे पुरविली आहेत. यावेळी प्रदीप विधाते यांचेही भाषण झाले. यावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी जिल्हा बँकेच्या उपक्रमाबद्दल आभार मानून शुभेच्छा दिल्या.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या