महावितरणला जबर फटका; अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित, पाणीपुरवठाही प्रभावित
Satara News : महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला घासून गुजरातकडे गेलेल्या चक्रीवादळाने सातारा जिल्ह्यातही आपला वरवंटा फिरवला आहे. वादळवाऱ्यासह जिल्ह्यात फलटण, माण वगळता सर्वदूर दमदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. विशेषत: जिल्ह्याच्या पश्चिम भागात वादळ व पावसाने महावितरणच्या यंत्रणेसह खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. तथापि, खरीप हंगामपूर्व मशागतींच्या दृष्टीने हा पाऊस उपयुक्त असल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे.
शनिवारपासूनच जिल्ह्याला चक्रीवादळाची चाहुल लागली होती. त्यामुळे जिल्हाभर पावसाळी वातावरण तयार झाले असून काल दिवसभर व रात्रभर जिल्ह्यात सर्वदूर सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पाऊस झाला. वादळाने सातारा, कराड, पाटणसह महाबळेश्वर, जावलीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळाने झाडे उन्मळून पडण्याच्या, झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात झाल्या असून त्यात वीजवाहक तारा तुटून, खांब पडून महावितरणचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी जिल्ह्यात अनेक ठिकाणी दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित झाला. पाणीपुरवठाही विस्कळीत झाला. त्यामुळे लोकांचे हाल झाले.
जनजीवन पूर्णत: थंडावले
आज पावसाचा जोर कमी झाला असला तरी वातावरण पावसाळी आहे. कोरोनामुळे व लॉकडाऊनमुळे आधीच सर्व व्यवहार थंड असून आता हवेत कमालीचा गारवा असल्याने जनजीवन पूर्णत: थंडावले आहे. जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात सरासरी एकूण २२.५३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळी ८ वाजेपर्यंत झालेला तालुकानिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये याप्रमाणे : सातारा १९.१०, जावली ३२.०४, पाटण ३५.०८, कराड ३२.९२, कोरेगाव ६.११, खटाव ५.८१, माण ०.४२, फलटण ०.००, खंडाळा २.४५, वाई १८.१४, महाबळेश्वर ९४.७ मिलीमीटर.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या