दि. २२ मे पासून रिक्षा चालकांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध
Satara News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या काही समाजघटकांना मदत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता परवानाधारक रिक्षाचालकांना एकवेळचे अर्थसहाय्य म्हणून दीड हजार रुपयांची मदत मिळणार आहे.
हे अर्थसहाय्य देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात आला आहे. रिक्षा चालकांना कोणतेही कागदपत्र सादर न करता केवळ ऑनलाईन प्रणालीवर त्यांचा वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक आणि आधार क्रमांक नोंद करावा लागणार आहे. ही माहिती संगणक प्रणालीवर प्रमाणित करण्यात येईल.
शासनाकडून संपूर्ण निधी उपलब्ध
दि. २२ मे पासून रिक्षा चालकांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील रिक्षा संघटना प्रतिनिधींना अर्ज प्रक्रियेबाबत ऑनलाईन सादरीकरण २१ मे रोजी करण्यात येणार आहे. रिक्षा चालकांच्या अर्थ सहाय्यासाठी शासनाकडून संपूर्ण निधी उपलब्ध झाला असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. ज्या रिक्षा चालकांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जुळतील, त्यांना एक वेळचे अर्थसहाय्य त्यांच्या संबंधीत बँक खात्यात त्वरित जमा होणार आहे, अशी माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाने दिली.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या