‘ते’ कोणत्या पक्षाशी व 'संघा'शी संलग्न आहेत याची सखोल चौकशी करा - शशिकांत शिंदे
Satara News : मराठा आरक्षण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे पडसाद सातारा शहरातही उमटले असून आज सकाळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराबाहेर गोवऱ्या जाळल्या गेल्या. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयांवरही दगडफेकीच्या घटना घडल्याने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला. दरम्यान, हे कृत्य करणारे कोणत्या पक्षाशी व 'संघा'शी संलग्न आहेत याची सखोल चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवण्याचा निर्णय काल दिला. त्याचे पडसाद आज साताऱ्यात उमटले. आज सकाळी शहरात राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाबाहेर काहींनी गोवऱ्या पेटवल्याचा प्रकार घडला. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर आणि दुपारी काँग्रेस भवनवर दगडफेक व तोडफोडीच्या घटना घडल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून घटनेचा निषेध
याबाबतचे वृत्त समजताच आमदार शशिकांत शिंदे, तेजस शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवनकडे धाव घेतली. अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस उपअधीक्षक आंचल दलाल यांनीही घटनास्थळी पोहचून पाहणी केली व कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. दरम्यान, हे कृत्य करणारे कोणत्या पक्षाशी व 'संघा'शी संलग्न आहेत याची सखोल चौकशी करावी अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
भ्रमात राहू नका, जशास तसे उत्तर देऊ शकतो
छत्रपती शिवरायांच्या राजधानीतील सच्चा मावळा असे कृत्य कधीही करणार नाही. त्यामुळे दगडफेक करणाऱ्या आरोपींचे कोणाकोणाशी संबंध आले? हा कट कुठे शिजला? याची पाळेमुळे पोलीस यंत्रणेने शोधली पाहिजेत. आपल्याला खूप मोठी शाबासकी मिळेल या भ्रमात संबंधितांनी राहू नये. आम्ही जशास तसे उत्तम प्रकारे उत्तर देऊ शकतो. - आमदार शशिकांत शिंदे
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या