श्रीमती खेतबाई धरमसी यांचे निधन; धरमसी बंधुंचे मातृछत्र हरपले
Satara News : मसूर (ता. कराड) येथील प्रतिष्ठित नागरिक श्रीमती खेतबाई गोविंदजी धरमसी (वय ८४) यांचे बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता मसूर येथे राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. प्रसिध्द उद्योजक खिरीष धरमसी यांच्या त्या आई होत.
खेतबाई धरमसी या गेले काही दिवस अंथरूणावरच होत्या. कुटुंबीय त्यांची खूप काळजी घेत होते. पण बुधवारी सायंकाळी सूर्यास्तासोबत त्यांचीही प्राणज्योत मालवली. अत्यंत विनयशील, सौजन्यशील, अगत्यशील असलेल्या खेतबाई या प्रेमळ, मनमिळावू व धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्या शिस्तप्रिय होत्या. तसेच त्या आधुनिक विचाराच्या होत्या. विशेषत: त्यांना वाचनाची आवड होती. मराठीतील दर्जेदार साहित्यकृती वाचल्यामुळे त्यांचे भावविश्व समृध्द झाले होते. त्यांच्याविषयी सर्वांच्या मनात आदराची भावना होती. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या