कामगार चळवळीत काम करणारे तळमळीचे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड
Satara News : एसटी कामगार संघटनेचे सक्रिय असलेले नेते व एसटी कामगार को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी संचालक, सेवानिवृत्त एसटी कर्मचारी विलास जाधव (७९) यांचे पुणे येथे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
१९७६ साली आणिबाणीच्या कालखंडात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली होत असताना विलास जाधव यांनी व्ही. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातारा येथे एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी अधिवेशन घेतले होते. त्याचबरोबर सातारा येथील प्रख्यात वकील व माजी आमदार स्मृतीशेष व्ही. एन. पाटील यांचे स्मारक सातारा येथे व्हावे यासाठी राज्य शासनाकडून जागाही मिळवून व्ही. एन. पाटील स्मारक समितीचे प्रमुख पदाधिकारी म्हणून ते काम पाहत होते. सेवानिवृत्तीनंतर ते पुणे येथे श्रमिक महिला मोर्चा या संघटनेत सक्रिय काम करत होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या