Satara News : तोत्येय चक्रीवादळाची गुजरातकडे आगेकूच


सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा

Satara News : दक्षिण पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘तोत्येय’ चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत असून येत्या काही तासांत कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. या वादळाचा तडाखा गुजरातसह महाराष्ट्रालाही बसणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. समुद्रातून हे वादळ गुजरातच्या दिशेने सरकण्यास सुरूवात झाली आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील उर्वरित भागातही याचा परिणाम दिसून येणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

किनारपट्टी भागात अतिवृष्टीचा इशारा

प्राथमिक अंदाजानुसार चक्रीवादळाचा संभाव्य मार्ग ओमानच्या दिशेने होता. त्यामुळे महाराष्ट्र किंवा गुजरातला त्याचा फटका बसणार नसल्याचे दिसून येत होते. मात्र, सध्याच्या अंदाजानुसार चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीकडे जाण्याचे संकेत आहेत. त्यामुळे ते समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ असेल. परिणामी किनारपट्टीच्या भागात ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वादळी वारे आणि अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुण्यातील एनडीआरएफची पथके गोव्याला रवाना झाली आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर तातडीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस

पश्चिम महाराष्ट्रातील घाटक्षेत्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील घाटक्षेत्रातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातही तुरळक पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातही मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

सलग चार वर्षे चक्रीवादळ

अरबी समुद्रात पूर्वमोसमी काळात २०१८ पासून सलग चौथ्या वर्षी चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. हवामानाचा आढावा घेण्यासाठी १९८० पासून उपग्रहाचा वापर सुरू झाला. उपग्रहाद्वारे नोंदी ठेवण्याचा कालखंड सुरू झाल्यापासून पूर्वमोसमी काळात सलग चार वर्षे चक्रीवादळाची निर्मिती होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या