Satara News : सोनगावात पूर्ववैमनस्यातून कुटुंबाला बेदम मारहाण


दहा जणांविरूध्द सातारा तालुका पोलिसात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

Satara News : शेतातील रस्त्याच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात ठेवून तसेच मुरूम काढू नका, आमच्या विहिरीला नुकसान होईल असे सांगितल्याच्या कारणातून सोनगाव (ता. सातारा) येथील एका कुटुंबातील आई, वडिलांसह दोन मुलांना मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी तेथीलच दहा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

यातील तक्रारदार आनंद मधुकर कदम (वय ३४, रा. सोनगाव तर्पâ सातारा) यांचे वडील मधुकर कदम शेतात उभे होते. त्यावेळी शेतातील रस्त्याच्या कारणातून झालेल्या वादाचा राग व ते तुम्ही मुरूम काढू नका, आमच्या विहिरीला नुकसान होईल असे म्हटल्याच्या कारणातून त्यांना श्रीरंग गोविंद कदम व संतोष रघुनाथ कदम यांनी हाताने मारहाण केली तर वसंत गोविंद कदम याने लाकडी दांडक्याने मारले.

हल्ल्यामुळे कुटुंबियांची घाबरगुंडी

यावेळी बजरंग गोविंद कदम यांनी तक्रारदार आनंद कदम यांना डोक्यात कुऱ्हाड मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तर वसंत कदम याने लाकडी दांडक्याने पाठीवर, हातावर मारहाण केल्याने आनंद कदम गंभीर जखमी झाले. यावेळी निलेश श्रीरंग कदम व माणिक शिवराम कदम यांनी मधुकर कदम यांना व भाऊ प्रवीण कदम यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली असून तक्रारदाराची आई सुलोचना कदम यांना श्रीरंग कदम याने कानाखाली मारून तिला ढकलून दिले. जमाव जमवून करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे कुटुंबीय घाबरून गेले होते. 

या प्रकरणी पोलिसांनी श्रीरंग गोविंद कदम, वसंत गोविंद कदम, बजरंग गोविंद कदम, संतोष रघुनाथ कदम, माणिक शिवराव कदम, तानाजी साहेबराव कदम, प्रदीप अर्जुन कदम, अशोक कोंडीबा कदम, निलेश श्रीरंग कदम (सर्व रा. साठेवाडी, सोनगाव तर्पâ सातारा) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक फरांदे करत आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या