Satara News : सातारा जिल्ह्यात लॉकडाऊन ‘कडक’


कोरोनाला रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सूर्योदयापासूनच उतरली रस्त्यावर

Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने आजपासून १ जूनपर्यंत कडक लॉकडाऊन जारी केला आहे. या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याकरिता आज सूर्योदयापासूनच पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली. त्यामुळे दिवसभर संपूर्ण जिल्ह्यात रस्ते निर्मनुष्य राहिले आणि सर्वत्र सन्नाटा पहायला मिळाला.

दररोजच रूग्णवाढीचे धडकी भरवणारे आकडे येत असल्यामुळे सातारा जिल्हा रेड झोनमध्ये गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर आजपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्याची कडक अंमलबजावणी व्हावी म्हणून सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरे आणि लहानलहान गावातही रस्ते आणि गल्ल्या बांबुचे अडथळे लावून बंद केल्या आहेत. वाहनांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे वाहनांची वर्दळ थांबली आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे.

विनाकारण फिरणारांची कोरोना टेस्ट

सातारा शहर तसेच कराड, फलटण, वाई, महाबळेश्वर, कोरेगाव, पुसेगाव, दहिवडी, म्हसवड, पाटणसह जिल्ह्यात सर्वत्र कडक लॉकडाऊनचा प्रभाव दिसत आहे. सातारा येथे शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे व कस्तुरबा गांधी आरोग्य केंद्राचे डॉ. दीपक थोरात यांच्या उपस्थितीत करंजे नाका येथे विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्याची मोहीम राबवली गेली. त्यामध्ये १३५ जणांच्या टेस्ट केल्या, त्यात १५ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची धक्कादायक बाब समोर आली.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या