Satara News : जिल्ह्यात दिवसभरात अडिच हजारजणांना डिस्चार्ज


बाधितपेक्षा सुखरूप घरी परतलेल्यांचा आकडा मोठा; जिल्ह्यात कोरोनामुक्त ‘लक्षाधीश’

Satara News : कोरोना रूग्णवाढीच्या रोजच्या आकड्यांनी हबकलेल्या जिल्हावासीयांच्या मनाला उभारी देणारी बातमी सायंकाळी आली. आज जिल्ह्यात पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळालेल्या रूग्णांची संख्या अधिक आली आहे. विविध रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या २५०६ नागरिकांना आज दिवसभरात घरी सोडण्यात आले आहे. या आकडेवारीसोबतच जिल्ह्यात आजअखेर कोरोनावर यशस्वीरीत्या मात करून घरी परतलेल्या रूग्णांची संख्या १ लाखांच्या वर गेली आहे.

गेल्या काही दिवसात जिल्ह्यात दररोज पॉझिटिव्ह येत असलेल्या रूग्णांची संख्या दोन ते अडिच हजारांच्या घरात आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येत आहे. दररोज बाधित निष्पन्न होणाऱ्या रूग्णांच्या तुलनेत डिस्चार्ज मिळणाऱ्या रूग्णांची संख्या कमी असल्यामुळे दिवसागणिक अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या फुगत चालली आहे. ज्यावेळी डिस्जार्चची संख्या वाढायला लागेल, त्यावेळी स्वाभाविकपणे अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या घटत जाणार आहे. त्यादृष्टीने आज हाती आलेली आकडेवारी जिल्हावासीयांना दिलासा देणारी ठरली आहे.

सातारा जिल्हा कोरोना 

  • एकूण नमुने - ६०५३८८
  • एकूण बाधित - १२५४७२
  • घरी सोडण्यात आलेले - १०००९२ 
  • मृत्यू - २९१७
  • उपचारार्थ रुग्ण - २२४३५

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या