Satara News : म्हसवडकर ज्वेलर्सचे सुभाषकाका शहा यांचे निधन


सचोटीने व्यवसाय करून नावलौकिक मिळवलेले उमदे व्यक्तिमत्त्व हरपले 

Satara News : सातारा येथील म्हसवडकर ज्वेलर्सचे मालक सुभाष हिराचंद शहा (वय ७५) यांचे शनिवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. म्हसवडकर ज्वेलर्सचे श्रेणीकभाई शहा व म्हसवडकर एजन्सीचे शशांकभाई शहा यांचे ते वडील होत.

साताNयातील म्हसवडकर उद्योग समुहाच्या जडणघडणीत सुभाषकाका यांचे मोलाचे योगदान होते. ते मनमिळाऊ स्वभावाचे व धार्मिक वृत्तीचे होते. सचोटीने व प्रामाणिकपणे व्यवसाय करणे ही त्यांची ख्याती होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मुलांनी व बंधूंनी व्यावसायिक क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. सातारा शहरातील विविध सामाजिक व वाणिज्य उपक्रमांच्या यशस्वितेमध्ये त्यांनी वेळोवेळी सक्रिय सहभाग दिला होता. 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या