Satara News : कोरोना टेस्ट न करता मिळवला बोगस रिपोर्ट


चौकशीत निष्पन्न; पाच जणांविरूध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
 

Satara News : सातारा जिल्हा रुग्णालयात कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट केली नसतानाही त्यासंबंधीचा बोगस रिपोर्ट मिळवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश प्रकाश घोरपडे (रा. निसराळे, ता. सातारा), अजय संजय डुबल (रा. शिवाजीनगर), महेश रामचंद्र जाधव (रा. अंबवडे, ता. सातारा), प्रमोद आनंदराव माने (रा  कुमठे, ता. सातारा), हरिदास नाथा कुंभार (रा. नागझरी, ता. कोरेगाव) या पाच संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी जिल्हा रुग्णालयाचे डॉ. ज्ञानेश्वर हिरास यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

जिल्हा रुग्णालयात टेस्ट केलीच नाही 

ही घटना दि. १४ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत घडली आहे. संशयितांनी संबंधित कोरोना आरटीपीसीआर टेस्ट सातारा जिल्हा रुग्णालयात रिपोर्ट मिळवला. वास्तविक त्यांनी सातारा जिल्हा रुग्णालयात टेस्ट केलेलीच नसल्याची बाब समोर आल्यानंतर त्याबाबतची चौकशी करण्यात आली. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने केलेल्या चौकशीत हे रिपोर्ट बोगस, खोटे असल्याचे समोर आले.

रिपोर्ट दिले कोणी, ‘घेतले’ कोणी ? 

या घटनेची गंभीर दखल घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाचे बोगस रिपोर्ट मिळाल्याचे समोर आल्यानंतर आरोग्य यंत्रणेमध्ये खळबळ उडाली आहे. संशयितांनी तो रिपोर्ट कुठून मिळवला? पैशाची देवाणघेवाण कितीची झाली? रिपोर्ट देणारे कोण आहेत? आतापर्यंत किती बोगस रिपोर्ट केले गेले? या टोळीमध्ये कोणाकोण आहेत? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या