Satara News : एक हजाराच्या मदतीची वाट बघताहेत फेरीवाले !


उदयनराजेंच्या घोषणेची सातारा नगरपालिका अंमलबजावणी करणार तरी कधी ?

Satara News : लॉकडाऊनमध्ये फेरीवाल्यांना दिलासा देण्यासाठी सातारा नगरपालिका फेरीवाल्यांना प्रत्येकी एक हजार रुपये मदत देणार असल्याची घोषणा खासदार उदयनराजे भोसले यांनी केली होती. या घोषणेला आता दीड महिना उलटला असून उपासमारीने हैराण झालेले फेरीवाले या एक हजार रुपयांच्या मदतीची डोळ्यात प्राण आणून आतुरतेने वाट बघत आहेत, असा सणसणीत टोला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला आहे.

कोरोना महामारी आणि लॉकडाऊन यामुळे गतवर्षात फेरीवाल्यांचे अतोनात नुकसान झाले. चालू घडीला फेरीवाल्यांचे जगणे मुश्किल झाले असून त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊनमध्ये फेरीवाल्यांना दिलासा मिळावा म्हणून खासदार उदयनराजेंनी सातारा नगरपालिकेकडून प्रत्येक फेरीवाल्याला एक हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मोठी घोषणा केली होती. गेले महिनाभरापासून लॉकडाऊन सुरु असून हातावर पोट असणाऱ्या फेरीवाल्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यांच्यासह त्यांच्या बायकापोरांची, वृद्ध आईवडिलांची उपासमार सुरु आहे. मात्र अद्यापही खासदार उदयनराजे यांनी जाहीर केलेली एक हजार रुपयांची मदत नगरपालिकेकडून फेरीवाल्यांना मिळालेली नाही. या घोषणेची सातारा नगरपालिका अंमलबजावणी करणार तरी कधी ? का ही घोषणाही हवेत विरणार आहे, असा सवाल आमदार शिवेंद्रराजे यांनी केला आहे.

कमिशन लाटायचे असल्याने विलंब ?

फेरीवाले डोळ्यात प्राण आणून या आर्थिक मदतीची वाट बघत बसले आहेत. घोषणा करून दीड महिना उलटला तरी नगरपालिकेकडून कोणतीही हालचाल झालेली नाही. बहुदा मर्जीतल्या ठेकेदारांची बिले काढायची गडबड असल्याने आणि त्यातून कमिशन लाटायचे असल्याने सातारा नगरपालिका फेरीवाल्यांचे पैसे देऊ शकत नसावी. फेरीवाल्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला असल्याने खासदार उदयनराजेंच्या घोषणेप्रमाणे नगरपालिकेकडून फेरीवाल्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे, असे आमदार शिवेंद्रराजे यांनी म्हटले आहे.   

अभिनव योजना जाहीर करा 

आता फेरीवाल्यांना मदत देता येत नसेल तर, लॉकडाऊन संपून पुन्हा कधी हॉकर्सचा व्यवसाय सुरु होईल आणि तेव्हा सत्ताधारी नगरसेवक फेरीवाल्यांकडून पुन्हा हप्ते गोळा करण्यास सुरुवात करतील, तेव्हा त्यामध्ये एक हजार रुपये कन्सेशन देऊ, अशी अभिनव योजना तरी नगरपालिकेने जाहीर करून टाकावी, असा टोला आमदार शिवेंद्रराजे यांनी लगावला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या