Satara News : जिल्ह्यात रोजची रूग्णवाढ दोन - अडिच हजार


चोवीस तासात २२९२ जणांचे अहवाल कोरोनाबाधित; तर ४० बाधितांचा मृत्यू

Satara News : सातारा जिल्ह्यात दररोजची रूग्णवाढ दोन ते अडिच हजाराच्या घरात गेली असल्याने अ‍ॅक्टिव्ह रूग्णांचा आकडा २० हजारांवर गेला आहे. परिणामी रूग्णांना रूग्णालयात बेड मिळणेही अवघड झाले आहे. आजही २२९२ इतकी रूग्णवाढ नोंदवली गेली असून आजवर बाधित झालेल्या रूग्णांचा आकडा १ लाख १६ हजार ४१७ पर्यंत गेला आहे. तसेच मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनामुळे ४० जणांचा बळी गेला आहे.

कोरोना बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ९२ (५५२७), कराड २७९ (१७२८५), खंडाळा ८१ (७१३९), खटाव ३१२ (१००३५), कोरेगाव १२७ (९७४३),माण १७९ (७४६७), महाबळेश्वर ३६ (३४६८), पाटण १४४ (४८२७), फलटण ३९२ (१५१७५), सातारा ४८३ (२६३९३), वाई १४७ (८७३१) व इतर २० (६२७) याप्रमाणे आजअखेर एकूण ११६४१७ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली २ (१०८), कराड ६ (४७५), खंडाळा ४ (९२), खटाव ३ (२८१), कोरेगाव ४ (२५३), माण १ (१५२), महाबळेश्वर ० (३४), पाटण ० (१२३), फलटण ३ (१९७), सातारा १२ (८०५), वाई ५ (२२०) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण २७४० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या