Satara News : मसूरमध्ये परिस्थिती गंभीर; दिवसभरात ५२ पॉझिटिव्ह


पुढील पंधरा दिवस जोखमीचे; शहाणपणाने न वागल्यास स्थिती चिंताजनक होण्याचा धोका

Satara News : कराड तालुक्यातील मसूरमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला असून आज एका दिवसात तब्बल ५२ जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सध्या धडकी भरावी अशी अवस्था असून पुढील पंधरा दिवस मसूरकरांसाठी अतिशय संवेदनशील आहेत. शहाणपणाने न वागल्यास मसूरची स्थिती चिंताजनक होण्याचा धोका आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सुरूवातीला बरेच दिवस मसूर सुरक्षित राहिले होते. त्यानंतर कोरोनाने मसूरमध्ये चंचूप्रवेश केला होता. पण ग्रामपंचायतीसह सर्वच घटकांनी जबाबदारीने वागून या संकटाला दूर ठेवण्यात यश मिळवले होते. परंतु मार्चपासून सुरू झालेल्या दुसऱ्या लाटेने सगळीकडेच हाहाकार माजवला आहे. ग्रामपंचायत, स्वच्छता कर्मचारी आपापली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत असले तरी लोकांनाच पहिल्यासारखे कोरोनाचे गांभीर्य दिसत नाही.

निर्बंध कडक, पण नागरिक अनिर्बंध 

संचारबंदी - कडक निर्बंध असले तरी नागरिक अनिर्बंध वागत आहेत. विनाकारण घराबाहेर पडणारांचे प्रमाण काही कमी झालेले नाही. भाजी, किराणा, औषधे खरेदीच्या नावाखाली, बँकेतील कामाच्या नावाखाली माणसे बाहेर पडतच आहेत. त्याचे विपरित परिणाम सध्या पहायला मिळत आहेत. 

मसूर कोरोनाचा अक्षरश: हॉटस्पॉट झाला असून सध्या गावात अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या १६० च्या घरात गेली आहे. आज गावात ब्रह्मपुरी, अष्टविनायक पेठ अशा दोन ठिकाणी तपासणी शिबिरे आयोजित केली होती. त्यामध्ये १०२ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तब्बल २४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच दोन दिवसात ज्यांचे नमुणे तपासणीसाठी पाठवले होते, त्याचे रिपोर्टही आज आले. हे सर्व मिळून आज एका दिवसात मसूरमध्ये ५२ जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. मसूरकरांसाठी ही धोक्याची घंटा आहे. आवश्यक काळजी न घेतल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका आहे. शासनासाठी नव्हे, तर आपल्यासाठी, आपल्या कुटुंबियांना कोरोनाच्या जीवघेण्या संकटापासून सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने शहाणपणाने व जबाबदारीने वागण्याची गरज आहे. अन्यथा काही खरे नाही.

पुढील पंधरा दिवस महत्त्वाचे

  • कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कफ्र्यूची अंमलबजावणी कडक झाली पाहिजे.
  • कोणीही खरोखरच अत्यावश्यक कारण नसेल, तर घराबाहेर पडणे टाळले पाहिजे.
  • बँका - पतसंस्था सुरू राहणार असतील तर त्यानिमित्ताने लोक बाहेर पडतात. त्याबाबत ग्रामपंचायत, आरोग्य व पोलीस यंत्रणा यांनी कठोर भूमिका घेतली पाहिजे.
  • लसीकरणासाठी आरोग्य केंद्रात गर्दी होत आहे. त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग धाब्यावर बसवले जात आहे. त्याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे मास्क, सॅनिटायझरचा वापर, वारंवार हात धुणे, सोशल डिस्टिन्सिंग पाळले पाहिजे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या