Satara News : सातारा जिल्ह्यात १७ ठिकाणी ऑक्सिजन प्लांट


कमतरता विचारात घेऊन एनडीआरएफच्या सहकार्यातून उभारणार प्रकल्प
 

Satara News : सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय आणि विविध ग्रामीण रुग्णालये अशा एकूण १७ ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभे राहणार आहेत. सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीतही जिल्हा परिषदेचे सर्व विभाग काम करीत आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यामुळे व्हेंटिलेटर तसेच ऑक्सिजन बेडची कमतरता जाणवत आहे. याचा विचार करुन जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय झाला आहे. यासाठी एनडीआरएफने आर्थिक सहकार्य केले आहे, असे विनय गौडा यांनी सांगितले.

लस ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटरची खरेदी

जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरू आहे, पण लसींचा तुटवडा आहे. लस पूर्ण क्षमतेने उपलब्ध झाल्यास जिल्ह्यात रोज एक लाख लोकांना लसीकरण होऊ शकते. जिल्ह्यासाठी येणारी लस ठराविक तापमानात ठेवण्यासाठी आवश्यक असणारे रेफ्रिजरेटरही खरेदी केलेले आहेत, त्यामुळे कोरोनाशी मुकाबला करणे सातारकरांना सोपे जाणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या