दोन दिवसातील आकड्यांनी सुखावलेल्या जिल्हावासीयांना आजच्या रूग्णवाढीने धडकी
Satara News : गेल्या दोन दिवसातील कोरोनाग्रस्तांच्या कमी आलेल्या आकड्यांनी सुखावलेल्या जिल्हावासीयांना आजचा आकडा पाहून जबरदस्त हादरा बसला. मागील चोवीस तासात जिल्ह्यात तब्बल २६९२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून हा आजपर्यंतचा उच्चांक आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात कालपासून ४१ बाधितांचा मृत्यू झाला आहे.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ११२ (६६९३), कराड २३४ (१९८३५), खंडाळा १२२ (८६६४), खटाव ३२३ (१२५६१), कोरेगाव ३६२ (१२१८९), माण २२१ (९५५६), महाबळेश्वर ४३ (३८०७), पाटण ८६ (५८१३), फलटण ४९४ (१९२७७), सातारा ४९२ (३१६४१), वाई १७४(१०४०६ ) व इतर २९ (८७०) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ४१ हजार ३१२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ३ (१४७), कराड २ (५७६), खंडाळा २ (११५), खटाव ८ (३५२), कोरेगाव ४ (२८६), माण १ (१८४), महाबळेश्वर ० (४१), पाटण १ (१४३), फलटण ५ (२३८), सातारा ९ (९३३), वाई ६ (२७९) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ३२९४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या