Satara News : जिल्ह्यासाठी ४४ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी


खरीप हंगामासाठी १.१७ लाख मे. टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर - पालकमंत्री

Satara News : खरीप हंगाम २०२१ साठी सातारा जिल्ह्याला १ लाख १७ हजार ७३० मे. टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर झाले असून ४४ हजार ५३५ क्विंटल बियाणांची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे, असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. यावर्षी चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून या खरीप हंगामात शेतकरी खते व बियाणांपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात झाली. त्यावेळी पालकमंत्री पाटील बोलत होते. या बैठकीला गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार अरुण लाड, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, कृषी सभापती मंगेश धुमाळ, जिल्हा अधीक्षक कृषी गुरुदत्त काळे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विनायक पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सोयाबीनचे बियाणे उपलब्ध करा

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक बंधने आली तरी राज्यासह देशात कृषी उत्पन्न वाढले आहे. खरीप हंगामात जिल्ह्यातील अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाते. सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील सोयाबीन विकला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गास सोयाबीनचे बियाणे उपलब्ध करुन देण्यावर कृषी विभागाने भर द्यावा. तसेच खतांचा अधिकचा स्टॉक करुन ठेवावा, अशा सूचनाही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी बैठकीत केल्या.

कर्ज पुरवठा उद्दिष्ट पूर्ण करा

खंडाळा, फलटण व माण तालुक्यात उन्हाळी कापूस पीक घेतले जाते. या भागातील शेतकऱ्यांना चांगले बियाणे उपलब्ध करुन देण्याबरोबरच खरेदी - विक्री केंद्र सुरु करण्यात यावे, अशा सूचना रामराजे नाईक - निंबाळकर यांनी केल्या. खरीप हंगामात खासगी बँकांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कर्ज पुरवठा करुन दिलेले कर्जाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, अशा सूचना शंभूराज देसाई यांनी केल्या.

या बैठकीत खासदार श्रीनिवास पाटील, आमदार अरुण लाड, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे यांनीही उपयुक्त अशा सूचना केल्या.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या