Satara News : बामणोली आरोग्य केंद्रात होणार कोविड सेंटर


आमदार शिवेंद्रराजे यांच्या आमदार फंडातून आर्थिक तरतूद; लवकरच सेवेस प्रारंभ

Satara News : जावली तालुक्यातील कसबे बामणोली आणि परिसरातील दुर्गम, डोंगराळ भागातील कोरोनाबाधित रुग्णांना बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपचाराची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या आमदार फंडातून ४ लाख ८२ हजार निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. येत्या दोन - तीन दिवसांमध्ये बामणोली आरोग्य केंद्रांमध्ये कोविड केअर सेंटर उभारणीस प्रारंभ होणार आहे.

कसबे बामणोली हा जावली तालुक्यातील अतिदुर्गम आणि डोंगराळ भाग आहे. बामणोली परिसरातील अनेक गावे दुर्गम असल्याने या भागातील कोरोनाबाधित रुग्णांच्या सोयीसाठी बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येच उपचाराची सोय व्हावी यासाठी आमदार शिवेंद्रराजे आग्रही होते. त्यांनी ३० एप्रिल रोजी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र पाठवून बामणोली आरोग्य केंद्रांमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून त्वरित जिल्हा नियोजन अधिकारी यांच्याकडे पाठवण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच त्यांनी जिल्हा नियोजन अधिकारी यांनाही बामणोली येथे कोविड केअर सेंटर सुरू करावे आणि त्यासाठी आमदार फंडातून निधी घ्यावा, अशी सूचना केली होती.

नियोजन समितीकडून प्रशासकीय मान्यता

शिवेंद्रराजे यांच्या प्रस्तावित सूचनेनुसार कसबे बामणोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आमदार फंडातून कोविड केअर सेंटर उभारणी करणे, त्यासाठी लागणारी सर्व प्रकारची यंत्रसामग्री, साहित्य, ऑक्सिजन, औषधे व वैद्यकीय टीम उपलब्ध करून देणे या कामाला जिल्हा नियोजन समितीकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

यासाठी आमदार शिवेंद्रराजे यांच्या फंडातून ४ लाख ८२ हजारांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत येत्या दोन - तीन दिवसांमध्ये बामणोली आरोग्य केंद्र येथे कोविड केअर सेंटर उभारणीस प्रारंभ होणार आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या