Satara News : बुध येथे अवैध वाळू वाहतूकीवर कारवाई


साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त; पुसेगाव पोलिसांचा दणका

Satara News : खटाव तालुक्यातील बुध येथे पुसेगाव - फलटण रस्त्यावर पुसेगाव पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करुन ट्रॅक्टर, ट्रॉली व गौण खनिजासह (वाळू) 3 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

बुध गावच्या हद्दीत ट्रॅक्टरच्या साह्याने अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक केली जात असल्याची खबर कोरेगावचे पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांना मिळाली होती. त्यानुसार आज त्यांनी तसेच पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी बुध हद्दीत पुसेगाव-फलटण रस्त्यालगतच्या एमएसईबी कार्यालयासमोर सापळा लावला असता तेथे ट्रॉलीद्वारे वाळूची चोरटी वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर निदर्शनास आला.

ट्रॅक्टर सोडून चालक पसार

पोलिसांना संशय आल्याने ट्रॅक्टर चालक मारुती उर्फ पिनू शामराव चव्हाण ट्रॅक्टर ट्रॉली तेथेच सोडून पळून गेला. या कारवाईत हवालदार कुंभार, झुंजार, धुमाळ, कर्पे, पवार, कुदळे, माने यांनी सहभाग घेतला. या घटनास्थळावरुन पोलिसांनी एक ट्रॅक्टर, ट्रॉली व गौणखनिजासह एकूण तीन लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबतचा गुन्हा पुसेगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या