Satara News : कोरोनाच्या नादात साथीच्या आजारांकडे दुर्लक्ष नको


पावसाळ्यात टायफाईड, डेंग्यू, अतिसारासारखे आजार पसरण्याची असते शक्यता

Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहोत. पण पावसाळ्यात टायफाईड, डेंग्यू, अतिसार यासारखे आजार पसरण्याची शक्यता असते. कोरोना संसर्गाची खबरदारी घेत असताना पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या साथीच्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

कोरोना विरोधात गेल्या वर्षीपासून लढा सुरू आहे. कोरोना नियंत्रणासाठी जिल्हावासियांचा पूर्वीसारखा सहभाग महत्त्वाचा आहे. टायफाईड, डेंग्यू, डायरिया असे आजार पावसाळ्यात पैâलावत असल्याने त्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. घरी वॉटर फिल्टर नसेल तर पाणी उकळून प्यावे. पाणीपुरवठा योजनेच्या पाण्यात टीसीएल व ब्लीचिंग पावडर टाकण्याचे काम ग्रामपंचायत स्तरावर सुरू आहे, असे जिल्हाधिकारी सिंह यांनी सांगितले.

विशेष कार्यक्रमांचे आयोजन करणार

डेंग्यूमध्ये डिहायड्रेशन होते. ताप, प्लेटलेट्स कमी होणे अशी लक्षणेही आढळतात. त्यामुळे वेळ न घालवता डॉक्टरांशी संपर्वâ साधून उपचार घ्यावेत. साथीच्या आजारांबाबत जिल्ह्यात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यायला सांगितलेली दक्षता

  • नागरिकांनी स्वच्छता राखण्याबरोबरच पाण्याचा स्त्रोतही स्वच्छ ठेवावा
  • अतिसाराची लागण झाल्यास प्राथमिक उपचार घ्यावेत
  • मुख्याधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवकांनी सार्वजनिक पाणीवितरण व्यवस्थेची स्वच्छता व दुरुस्ती करावी
  • टीसीएल, ब्लीचिंग पावडरचा वापर वेळापत्रकानुसार व ठरवून दिलेल्या प्रमाणात करावा
  • डेंग्यू पसरू नये यासाठी टायर, रिकामे डबे, कूलर अशा ठिकाणी असलेल्या पाण्याचा निचरा करावा
  • घरातील कुंड्यांमध्ये साचलेले पाणी काढावे

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या