पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची ग्वाही; साताऱ्यात आत्मक्लेश आंदोलन
Satara News : गेल्या सव्वा वर्षापासून कोरोना संसर्गाने थैमान घातले असून याची किंमत पत्रकारांनादेखील मोजावी लागली आहे. त्यांना सरसकट लस मिळाली पाहिजे, असे आपल्यालाही वाटते. त्यामुळे पत्रकारांच्या मागण्या आपण सरकारदरबारी पोहोचवू, अशी ग्वाही राज्याचे सहकारमंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
महाराष्ट्रदिनी मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, किरण नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी राज्यात जिल्हानिहाय आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनीही दिवसभर अन्नत्याग करून आत्मक्लेश आंदोलन केले. तत्पूर्वी सकाळी महाराष्ट्रदिनी झेंडावंदनासाठी आलेल्या पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची पत्रकार संघाच्या पदाधिकाNयांनी भेट घेतली. प्रिंट व इलेक्ट्रॉनिकच्या पदाधिकारी यांनी निवेदनही दिले.
वर्षभरात १२२ पत्रकारांचा मृत्यू
कोरोना संसर्गामुळे देशात हाहाकार उडाला आहे. याचा फटका मीडिया क्षेत्रालादेखील बसला आहे. गत वर्षीच्या तुलनेत गेल्या दोन महिन्यात कोरोना संसर्गामुळे पत्रकारांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून दिवसेंदिवस त्यात चिंताजनक वाढ होत आहे. संसर्ग वाढत असतानाही पत्रकार समाजात वावरून बातम्या देत आहेत. शासनाच्या भूमिका मांडून गरजूंना मदत मिळण्यासाठी पत्रकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यातूनच एकट्या महाराष्ट्र राज्यात गेल्या वर्षभरात सुमारे १२२ पत्रकारांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेक तरुण पत्रकारांचा समावेश असून अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. पत्रकारांना मदत मिळण्यासाठी शासनाने स्वत:हून पाऊल टाकणे गरजेचे असताना दुर्दैवाने शासनाने कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही, असे या निवेदनात म्हटले आहे.
पत्रकारांच्या सर्व मागण्या आपण शासन दरबारी पोहोचवू, अशी ग्वाही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. यावेळी हरीष पाटणे, विनोद कुलकर्णी, दीपक प्रभावळकर, जीवनधर चव्हाण, राहुल तपासे, तुषार तपासे, ओंकार कदम, सनी शिंदे, प्रशांत जगताप, साई सावंत आदी उपस्थित होते.
दरम्यान, या मागणीसाठी १ मे रोजी राज्यात घरीच राहून पत्रकारांनी आत्मक्लेश आंदोलन केले. दिवसभर अन्नत्याग करून हे आंदोलन करण्यात आले. सातारा जिल्ह्यातही आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. अध्यक्ष हरीष पाटणे यांनी घरी थांबून आत्मक्लेश आंदोलन केले.
पत्रकारांच्या प्रमुख मागण्या
- दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबाला तातडीने ५ लाख रुपये द्यावेत.
- वयोगट न पाहता पत्रकार व त्यांच्या कुटुंबासाठी सरसकट लसीकरणाचे कॅम्प आयोजित करावेत.
- कोरोनाबाधित पत्रकारांसाठी जिल्हा व तालुका हॉस्पिटलमध्ये बेड राखीव ठेवावेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या