रूग्णालयांनी जादा आकारलेले २०.५६ लाख रूपये परत करण्याचे आदेश
Satara News : सातारा जिल्ह्यातील विविध रूग्णालयांकडून कोरोना बाधितांची लूट होत असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. १८३ कोरोना बाधितांच्या उपचारांच्या बिलांमध्ये या रूग्णालयांनी तब्बल २० लाख ५६ हजार ७४३ रूपये जादा आकारले गेल्याचे स्पष्ट झाले असून ही रक्कम परत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.
रूग्णालयांकडून कोरोनाबाधितांवर केल्या जात असलेल्या उपचारांसाठी अवाजवी पध्दतीने बिले आकारली जात असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. या पाश्र्वभूमीवर महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ बाधित रुग्णांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन देण्याबाबत शासनाने वेळावेळी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होते आहे का ? तसेच जिल्ह्यातील रुग्णालयांकडून कोरोना बाधित रुग्णांकडून आकारण्यात येणारे बाबनिहाय वैद्यकीय उपचारांचे देयक योग्य आहे काय ? याची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यातील ६३ हॉस्पिटलसाठी ६३ ऑडीटर व तपासणी अधिकाNयांच्या पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
यापूर्वीही तपासणीत आढळली लूट
यापूर्वीही या पथकांच्या तपासणीत लाखोंची जादा बिले आकारली गेल्याचे दिसून आले होते. आता नव्याने अशाप्रकारे तक्रारी आलेल्या बिलांची तपासणी केली असता १८३ रुग्णांच्या बिलांमध्ये २० लाख ५६ हजार ७४३ रूपये जादा आकारल्याचे दिसून आले. ही रक्कम परत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले आहेत.
या पथकामार्फत आजवर एकूण ६३ हॉस्पिटलमधील ४५७९ एवढ्या रुग्णांच्या बिलांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये रुग्णालयांनी २२ कोटी ६२ लाख २० हजार २३९ इतकी रक्कम आकारली असल्याची माहिती समोर आली आहे.
८० टक्के बेड राखीव ठेवण्याच्या सूचना
जिल्ह्यामध्ये महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना २८ हॉस्पिटलमध्ये सुरु असून या हॉस्पिटलमध्ये एकूण बेडच्या ८० टक्के बेड राखीव ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या