Satara News : रुग्णवाहिकेच्या लुटमारीवर आरटीओचे ‘औषध’


उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून भाडेदर निश्चित; दरपत्रक लावणे बंधनकारक

Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने रुग्णवाहिका फार्मात आल्या आहेत. मात्र लोकांच्या असहाय्यतेचा फायदा घेवून रूग्णवाहिकेच्या सेवेसाठी अव्वाच्या सव्वा रक्कम आकारली जात आहे. आता सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने रुग्णवाहिकेचे भाडे दर निश्चित करून या लुटमारीला लगाम घालण्याचे पाऊल उचलले आहे. या औषधाचा काय परिणाम समोर येतो याकडे आता सर्वांचेच लक्ष राहणार आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने घेतलेल्या निर्णयानुसार मारुती व्हॅनसाठी २० किमी अथवा दोन तासासाठी ३५०, प्रति किलोमीटर १२ व २४ तासासाठी १ हजार २०० रुपये भाडे निश्चित केले आहे. टाटा सुमो व तत्सम २० किमी अथवा दोन तासासाठी ४५०, प्रतिकिमी १३ व २४ तासांसाठी १ हजार ५०० रुपये भाडे निश्चित केले आहे. टाटा ४०७ साठी २० किमी अथवा दोन तासासाठी ५५०, प्रतिकिमी १४ व २४ तासांसाठी २ हजार रुपये भाडे निश्चित केले आहेत. वातानुकूलित वाहनासाठी २० किमी अथवा दोन तासासाठी ७००, प्रतिकिमी २० व २४ तासासाठी ३ हजार रुपये भाडे निश्चित केले आहे.

जास्त भाडे घेता येणार नाही

दरपत्रकात दर्शवलेल्या भाडे दरापेक्षा कमी अथवा मोफत सेवा देता येवू शकेल. पण प्रस्तावित भाडे दरापेक्षा जास्त भाडे आकारता येणार नाही. हे भाडे सर्व रुग्णवाहिकांच्या आतील बाजूस प्रदर्शित करणे चालक व मालकांना बंधनकारक आहे. २० किलोमीटरच्या पुढे अंतर गेल्यास प्रति किलोमीटरनुसार मूळ भाडेदरात वाढ करावी, अशा सूचना उपप्रादेशिक कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या