सातारा येथील संशोधकांनी शोधून काढल्या चतूर (सुई) डॅमसेलफ्लायच्या नवीन प्रजाती
Satara News : सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट प्रदेश हा नेहमीच जैवविविधतेचे माहेरघर राहिलेला आहे. येथीलच ठोसेघर - चाळकेवाडी व कास परिसरातून सातारा येथील संशोधकांना चतूर (सुई) डॅमसेलफ्लायच्या दोन नवीन प्रजातींचा शोध लावण्यात यश मिळाले आहे.
सातारा येथील फुलपाखरू अभ्यासक डॉ. श्रीराम भाकरे, प्रा. डॉ. प्रतिमा पवार व सुनील भोईटे या तीन संशोधकांनी त्रिवेंद्रम (केरळ) येथील डॉ. कलेश सदाशिवन आणि विनयन नायर यांच्या सहकार्याने हे यश प्राप्त केले आहे. युफाइऱ्या वर्गातील या दोन नव्या प्रजाती आता युफाइऱ्या ठोसेघरेन्सीस व युफाइऱ्या स्युडोडीस्पार या नावाने ओळखल्या जातील. या संबंधीचा शोधनिबंध नुकताच 'जर्नल ऑफ थ्रेटंड टास्का' या शोधपत्रात प्रसिद्ध झाला आहे. पश्चिम घाटात यापूर्वी नोंद झालेल्या तीन प्रजातींमध्ये या दोन नव्या प्रजातींची आता भर पडलेली आहे. या सर्व पाचही प्रजाती केवळ हिंदुस्थानातील पश्चिम घाट क्षेत्रातच आढळून येत असून त्या प्रदेशनिष्ठ आहेत.
प्रजातीस दिले ठोसेघरचे नाव
यूफाइNया ठोसेघरेन्सीस व युफाइऱ्या स्युडोडीस्पार या नव्याने नोंद करण्यात आलेल्या दोन प्रजातीदेखील उत्तर पश्चिम घाट क्षेत्रात फक्त ठोसेघर - चाळकेवाडी व कास परिसरातच आढळून येतात. यामधील युफाइऱ्या ठोसेघरेन्सीस ही प्रजाती निसर्ग जैवविविधतेचे प्रतीक म्हणून प्रजातीस ठोसेघरचे नाव देण्यात आले आहे. या नवीन प्रजातींच्या शोधामुळे पश्चिम घाटातील जैवविविधता व त्याचे संवर्धनमूल्य पुनश्च एकदा अधोरेखित झाले आहे.
टोरंट डार्ट या सामान्य नावाने ओळखले जाणारे हे डॅमसेलफ्लाय या प्रकारातील कीटक असून स्थानिक मराठी भाषेमध्ये यास सुई किंवा चतुर असे संबोधले जाते. नदी, नाले, ओहोळ, जलाशय अशा विविध पाणथळ जागी यांचा वावर दिसून येतो. यांच्या जैवशृंखलेमधील प्राथमिक अवस्था या पाण्यामध्येच पूर्ण होत असतात व त्यानंतर ते पंख फुटून पाण्याबाहेर उडू लागतात. वातावरणाप्रती हे अत्यंत संवेदनशील जीव असून त्यामुळेच त्यास आदर्श परिसंस्थेचे निर्देशक देखील मानले जाते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या