सीएसआरमधून कोविड रूग्णालय उभारा; अन्यथा वेगळा विचार करावा लागेल
Satara News : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील उद्योगांनी सामाजिक दायित्व निधीचा विनियोग करुन कोविड उपचारासाठी दवाखाना उभा करावा, अशी भूमिका खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मांडली आहे.
यासंदर्भात उदयनराजे यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील सेझ व डी झोनचा फायदा घेतलेल्या कंपन्यांच्या बॅलन्स शिट प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी मागवाव्यात तसेच कायद्याने अनिवार्य असलेल्या सामाजिक दायित्व निधीमधून जिल्ह्यात कोविड उपचारासाठी दवाखाना उभा करावा अशा सूचना त्यांनी प्रभारी जिल्हाधिकारी यांना केल्या.
त्या उद्योगांच्या बॅलन्स शिट पुढील बैठकीत बरोबर घेऊन, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी, कंपनीचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक लवकर घेण्यात यावी अशी सूचना त्यांनी प्रभारी जिल्हाधिकारी यांना केली.
... तर वेगळा विचार करावा लागेल !
तसेच कंपन्या हा खर्च करुन स्थानिक नागरिकांवर उपकार करत नसून ते त्यांना कायद्याने बंधनकारक आहे. जर या निधीमधून स्थानिक जनतेसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिली नाही, तर कंपन्यानी शासकीय योजनांचा आतापर्यंत घेतलेला फायदा याचा हिशोब करुन त्यासंदर्भात वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बैठकीत दिला.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या