१७२६ जण पॉझिटिव्ह, तर २३७९ जण कोरोनामुक्त; आणखी ३७ बाधितांचा मृत्यू
Satara News : सातारा जिल्ह्यात आज हाती आलेली आकडेवारीही कालप्रमाणे उत्साह वाढवणारी आहे. आजही कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांपेक्षा कोरोनावर मात केल्याने घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. जिल्हावासीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे. काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात १७२६ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर आज दिवसभरात २३७९ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्याचप्रमाणे ३७ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ७३ (६४१३), कराड २०३ (१९३७२), खंडाळा ११० (८३७३), खटाव २३० (११९४३), कोरेगाव १३९ (११५४८), माण १७३ (९०८८), महाबळेश्वर २६ (३६६२), पाटण ६९ (५५९२), फलटण २२४ (१७९८०), सातारा ३६४ (३०२५९), वाई ९९ (९९४१ ) व इतर १६ (७८६) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ३४ हजार ९५७ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ० (१३९), कराड ४ (५४८), खंडाळा १ (१०८), खटाव ७ (३२८), कोरेगाव २ (२७३), माण ० (१७४), महाबळेश्वर १ (४१), पाटण ४ (१३८), फलटण २ (२३०), सातारा १४ (८९९), वाई २ (२६४) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ३१४२ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - ६३४४५०
- एकूण बाधित - १३४९५७
- घरी सोडण्यात आलेले - ११०२८३
- मृत्यू - ३१४२
- उपचारार्थ रुग्ण - २१५०६
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या