Satara News : पसार होण्याच्या तयारीतील गुन्हेगार जेरबंद


फलटणमध्ये जबरी चोरी करून परजिल्ह्यात जाण्यापूर्वीच पडल्या बेड्या
 

Satara News : जबरी चोरीचा गुन्हा करून परजिल्ह्यात पसार होण्याच्या तयारीत असलेल्या संशयितांना २४ तासांत जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. महेश जयराम जगदाळे, ऋतिक उर्फ बंटी देवानंद लोंढे (वय २७, दोघेही रा. कांबळेश्वर ता. बारामती, जि. पुणे) व संकेत सुनिल जाधव (वय २४, रा. कल्पनानगर, तांदूळवाडी रोड, बारामती, जि. पुणे) अशी संशयितांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना दि. २४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

फलटण शहर पोलीस ठाण्यात दोन जबरी चोरीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुखांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांच्या अधिपत्याखाली यासाठी एक पथक तयार केले होते. आरोपींनी गुन्हा करताना कोणत्याही प्रकारचा मोबाईल वापरलेला नसताना फक्त फिर्यादी यांनी दिलेल्या तोंडी माहितीच्या आधारे बारामती तालुक्यातील एका रेकॉर्डवरील आरोपीचे नाव निष्पन्न केले. नंतर पथकाने बारामती तालुक्यात जावून या आरोपीची माहिती घेतली.

फलटणमध्ये सापळा रचून पकडले 

गुन्ह्यातील आरोपी हे फलटणमधील सोमवार पेठ येथे येणार असल्याची बातमी बातमीदारामार्फत साबळे यांना मिळाल्याने त्यांनी सोमवार पेठ येथे सापळा लावला. सायंकाळच्या वेळेस पल्सर मोटार सायकलवरून तीन इसम बारामती बाजूकडून फलटण बाजूकडे येताना दिसताच त्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवार पेठ येथे ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी वरील दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिल्याने त्यांना पुढील कारवाईकरिता फलटण शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्याकडून पल्सर मोटार सायकल (एमएच १२ एमएस २४६) ताब्यात घेण्यात आलेली आहे. पुढील तपास फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम करीत आहेत.

जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनांप्रमाणे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, रमेश गर्जे, नवनाथ गायकवाड, सचिन राऊळ, सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, ज्योतीराम बर्गे, पोलीस हवालदार विजय कांबळे, पोलीस नाईक शरद बेबले, साबीर मुल्ला, रवींद्र वाघमारे, प्रविण कांबळे, वैभव सावंत, विजय सावंत यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या