सहा हजार ६९७ बिगर निवासी मिळकतधारकांना ७१.५७ लाखांची सूट
Satara News : सातारा शहरातील बिगर निवासी मिळकतधारकांना लॉकडाऊन कालावधीतील तीन महिन्याची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय सातारा नगरपालिकेने विशेष सभेत घेतला होता. या निर्णयानुसार शहरातील ६ हजार ६९७ मालमत्ताधारकांना सुमारे ७१ लाख ५७ हजार १३ रुपयांची सूट देण्याची प्रक्रिया नगरपालिका स्तरावर सुरू झाल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांच्या वतीने देण्यात आली आहे.
शहरातील बिगर निवासी मिळकतधारकांची लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांची घरपट्टी माफ करण्याचा विषय नगरपालिकेच्या सभेपुढे ठेवण्यात आला होता. या विषयाला बहुमताने मंजुरी मिळाल्यानंतर तो प्रस्ताव खासदार उदयनराजे भोसले यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला होता. यात बिगरनिवासी तसेच निवासी मिळकतधारकांना तीन महिन्यांची घरपट्टी माफी देण्याची मागणी केली होती. निवासी मिळकतधारकांच्या सवलतीच्या अनुषंगाने सध्या मंत्रालयीन स्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे उदयनराजे यांनी पत्रकात नमूद केले आहे.
नगरपालिकेकडून अंमलबजावणी सुरू
निवासी मिळकतधारकांना घरपट्टी माफी देण्याचा निर्णय होईपर्यंत नगरपालिका कायद्यातील तरतुदींच्या आधारे सन २०२० - २१ या आर्थिक वर्षातील तिमाही बिगर निवासी मिळकतींचा मालमत्ता करमाफीची अंमलबजावणी सातारा नगरपालिकेने सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात याचा ६ हजार ६९७ बिगर निवासी मिळकतधारकांना फायदा होणार असून त्यांचा सुमारे ७१ लाख ५७ हजार रुपयांचा मालमत्ता कर माफ होणार आहे. केंद्राकडून अतिरिक्त निधी मिळवत प्रशासकीय खर्चात बचत करत घरपट्टीमाफीतून होणारी तूट भरून काढण्यात येणार असल्याचेही उदयनराजे यांनी पत्रकात म्हटले आहे.
शहरातील सर्व घटकांना विचारात घेत त्यांच्यासाठीची विकासकामे राबविण्यावर सातारा विकास आघाडीचा भर आहे. व्यापक हित लक्षात घेत अशाप्रकारे घरपट्टीमाफ करणारी सातारा ही राज्यातील पहिलीच नगरपालिका असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या