Satara News : जिल्ह्यात सात दिवसांचा कडक लॉकडाऊन


जीवनावश्यक वस्तू ठराविक वेळेत घरपोच; अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व बंद
 

Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने मंगळवार दि. ४ पासून सात दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामध्ये कृषी संबंधित दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून जीवनावश्यक वस्तू लोकांना मिळाव्यात यासाठी याच वेळेत घरपोच सेवा देण्यास मुभा दिली आहे. मेडिकल दुकाने आधीप्रमाणेच सुरू राहतील. या सात दिवसात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

जिल्ह्यात सध्या कोरोनाचा मोठा उद्रेक झाला असून दररोज बाधित निघणाऱ्यांची संख्या अडिच हजारांच्या घरात गेली आहे. मृत्यूदरही वाढला असून आजअखेर अडिच हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेवर अभूतपूर्व ताण आला आहे. शासनाच्या 'ब्रेक द चेन' मोहिमेअंतर्गत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सद्यस्थितीत लागू असलेले निर्बंध अधिक कडक करणे गरजेचे झाले आहे. त्या अनुषंगाने आज सातारा येथे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची बैठक झाली. त्यामध्ये निर्बंध कडक करण्याचा निर्णय झाला. या बैठकीस पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

जीवनावश्यक वस्तुंना विंâचित सवलत 

बैठकीत झालेल्या निर्णयानुसार प्रभारी जिल्हादंडाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दि. ४ रोजी सकाळी ७ वाजलेपासून दि. १० रोजी रात्री १२ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विव्रेâते, डेअरी, बेकरी, मिठाई इत्यादी सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी यासह), पाळीव प्राण्यांच्या खाद्य पदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणाNया साहित्याच्या उत्पादनाशी निगडीत दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तथापि, या दुकानांची घरपोच सेवा सकाळी ७ ते ११ या कालावधीतच सुरू ठेवण्यास परवानगी राहील. कृषी अवजारे व शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने सकाळी ७ ते ११ या कालावधीतच सुरू राहतील. तथापि, या दुकानांची घरपोच सेवा सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी राहील.

अंमलबजावणीत टाळाटाळ केल्यास कारवाई 

हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्री दुकाने यांची घरपोच पार्सल सेवा दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंतच सुरू राहील. तसेच त्यासंबंधित इतर बाबींना दि. १४ एप्रिल रोजीचे आदेश लागू राहतील. घरपोच मद्य विक्रीबाबत दि. २० एप्रिल रोजीच्या आदेशामध्ये नमूद कालावधीमध्ये दुपारी १२ ते सायंकाळी ५ असा बदल करण्यात आला असून या आदेशातील इतर सर्व बाबी कायम राहतील. 

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० व भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम १८९७ अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या