Satara News : खासदार, आमदारांना अडवा; त्यांना जाब विचारा - उदयनराजे


मराठा आरक्षण रद्दच्या निकालासंदर्भात धडाडली खासदार उदयनराजे भोसले यांची तोफ
 

Satara News : मराठा आरक्षण प्रश्नी खासदार, आमदारांना आडवा, त्यासंदर्भात त्यांना जाब विचारा, त्यांच्याकडे बोलण्यासारखे आता काही राहिले नाही. त्यांना मतदार संघात फिरू देऊ नका, असा संदेश खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज मराठा समाजबांधवांना दिला. आता जनताच लोकप्रतिनिधींची मस्ती उतरवेल, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून अस्वस्थ झालेल्या उदयनराजे यांनी आज सातारा येथे आपल्या भावना प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या. यापूर्वी समाजामुळे आपण लोकप्रतिनिधी आहोत असे सगळ्यांना वाटत होते. मात्र आता माझ्यामुळे समाज आहे, अशी धारणा झाल्यामुळे जनताच लोकप्रतिनिधींची मस्ती उतरवेल, असे त्यांनी सुनावले. कुणालाही हा निकाल मान्य नाही. इतर समाजाला आरक्षण दिले गेले तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात अभ्यास झाला का, असा सवाल करत, आमचे मित्र अशोक चव्हाण म्हणतात पेपर आल्यानंतर अभ्यास करून त्यावर प्रतिक्रिया दिली जाईल. मात्र ते काहीही म्हणत असले तरी, मराठा समाजावरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

वकील न्यायालयात हजर राहत नाही

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मराठी युवकांचे आयुष्य अंधारमय झाले आहे. मराठा आरक्षणप्रश्नी नेमलेला वकील न्यायालयात हजर राहत नाही. न्यायालयात आरक्षणाची माहिती वेळेवर दिली जात नाही. जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा हा एक डाव असून यांच्यापेक्षा जनावरे परवडली, अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी आपला उद्वेग व्यक्त केला.

जगात वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस आहेत. त्यापैकीच एक कोरोना हा एक व्हायरस आहे. देशातील सायंटिस्ट लोकांनी एकत्र येऊन रेमडिसिवीर या इंजेक्शनच्या दुष्परिणामांची माहिती देण्याची गरज आहे. या कठीण प्रसंगात नागरिकांनी लिंबू, आले, साखर, मीठ, ऑरेंज ज्यूस याचा वापर करावा असे आवाहन करून रयत शिक्षण संस्थेच्या मोकळ्या इमारतींचा आयसोलेशनसाठी वापर करण्यात यावा अशा सूचना आपण जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या