Satara News : मेडिकल कॉलेजसाठी सातारा जिल्हा बँकेची मदत


इन्स्पेक्शनपूर्वी उपकरणे हवीत म्हणून तात्काळ १५ लाखांचा डीडी सुपूर्द
 

Satara News : सातारा येथे लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असून त्यासाठी जलसंपदा विभागाची जागा हस्तांतर झाली असून या जागेत १०० विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय आणि ५०० खाटांचे रुग्णालय उभारणीसाठी एकूण ४९५ कोटी ४६ लाख एवढ्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सन २०२१ - २२ या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेकडून महाविद्यालयाची पाहणी होणार आहे. या पाहणीसाठी तातडीने उपकरणांची उपलब्धता करणे आवश्यक असल्याने त्यासाठी सातारा जिल्हा बँकेने मदत करण्याचा निर्णय घेऊन १५ लाखांचा डिमांड ड्राफ्ट महाविद्यालयाचे डीन डॉ. संजय गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केला. 

यावेळी रामराजे नाईक - निंबाळकर, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले, उपाध्यक्ष सुनील माने, आमदार शशिकांत शिंदे, शिवरूपराजे खर्डेकर, दत्तानाना ढमाळ, राजेंद्र राजपुरे, अनिल देसाई यांच्यासह संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये व मान्यवर उपस्थित होते.

बँकेने सामाजिक बांधिलकी जोपासली

सातारा येथे उभ्या राहणाऱ्या मेडिकल कॉलेजमुळे आता सातारा येथील नागरिकांना पुणे व मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही. याच बरोबर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. जिल्हा बँकेने आताही सामाजिक बांधिलकी जोपासत ही मदत केली आहे, असे प्रतिपादन रामराजे यांनी यावेळी केले. हे मेडिकल कॉलेज सुरू झाल्यानंतर याचा देशातील अग्रगण्य वैद्यकीय संस्थांमध्ये समावेश होईल, असे बाळासाहेब पाटील म्हणाले. 

मेडिकल कॉलेजचा फायदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाही होणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना वैद्यकीय शिक्षणासाठी किंवा उपचारासाठी परजिल्ह्यात जाण्याची गरज राहणार नाही, असे उद्गार आमदार शिवेंद्रराजे यांनी काढले. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, सुनील माने, डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. संजय गायकवाड यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांना

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या