Satara News : जिल्ह्यातील खाजगी डॉक्टरांना कळकळीचे आवाहन


लसीकरण मोहिमेत सेवाभावी वृत्तीने सहभागी व्हा - पालकमंत्री पाटील

Satara News : कोरोना लढ्यात शासकीय डॉक्टर, कर्मचारी अहारात्र झटत आहेत. त्यांचा ताण कमी करण्यासाठी जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी सेवाभावी वृत्तीने लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबत आढावा पालकमंत्री पाटील यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील आदी उपस्थित होते.

तरूणांनो, आजार अंगावर काढू नका !

सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असून यामध्ये तरुण वर्ग जास्त बाधित होत आहेत. अशा बाधित रुग्णांनी आजार अंगावर न काढता तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधून औषधोपचार सुरु करावेत, असे कळकळीचे आवाहनही बाळासाहेब पाटील यांनी केले. 

ऑक्सिजन प्लांटला प्राधान्य द्या 

जिल्ह्यात ज्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट मंजूर केले आहेत तेथे तात्काळ प्लांट सुरु करण्याच्या कामास प्राधान्य द्या. सहकारी साखर कारखान्यांनी ऑक्सिजन प्लांट सुरु करावेत, याबाबत साखर कारखान्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात यावे. शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी विविध रुग्णालयांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या कामाबरोबर कोरोनाबाबतची इतर कामे करीत आहेत. त्यांचा ताण कमी करण्यासाठी जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी सेवाभावी वृत्तीने लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी या बैठकीत केले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या