जिल्ह्यात ३१ बाधितांचा मृत्यू; खटाव, फलटण तालुक्यात उच्चांकी पॉझिटिव्ह
Satara News : सातारा जिल्ह्याला कोरोना संकटाच्या बाबतीत अद्याप दिलासा नाहीच. कारण आज पुन्हा जिल्हावासीयांची झोप उडवणारी रूग्णवाढीची आकडेवारी समोर आली आहे. काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २६४८ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ३१ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूध्द आठल्ये यांनी दिली.
चोवीस तासातील रूग्णवाढीमध्ये व मृतांच्या संख्येतही खटाव तालुक्याने रेकॉर्ड तोडले आहे. सातारा, कराडपेक्षा आता खटाव, फलटण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमालीचा वाढलेला दिसत असून स्थिती चिंताजनक आहे. त्याचवेळी आजवरच्या जिल्ह्यातील रूग्णसंख्येने दीड लाखांचा टप्पा ओलांडला असून एकट्या सातारा तालुक्यातील एवूâण बाधित निघालेल्यांची संख्या ३३३३३ झाली आहे.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ४७ (६९७९), कराड १८२ (२०८८०), खंडाळा ३६२ (९४९३), खटाव ५६६ (१४०१४), कोरेगाव २१२(१३१६९), माण २०७ (२०२९२), महाबळेश्वर ३९ (३८८९), पाटण १०९ (६१८९), फलटण ५१५ (२११६२), सातारा ३११ (३३३३३), वाई ८४ (११०३५ ) व इतर १४ (९५२) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ५१ हजार ३८७ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ५ (१५८), कराड ३ (६०२), खंडाळा ० (१२४), खटाव ८ (३८१), कोरेगाव ४ (२९९), माण ० (१९५), महाबळेश्वर ० (४२), पाटण ० (१५०), फलटण १ (२४२), सातारा ७ (९७१), वाई ३ (२९२) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ३४५६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या