Satara News : अखेर काशिळच्या रूग्णालयास मुहूर्त सापडला


‘सातारा अपडेट्स’ने सर्वप्रथम फोडली वाचा;
 सुरूवातीला ३२ ऑक्सिजन बेड होणार उपलब्ध

Satara News : पुणे ते बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा तालुक्यात काशिळ येथे उभारण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे (कोविड रुग्णालय) उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि. ३ मे रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. कोरोना संकटाच्या काळात लोक बेडसाठी धावाधाव करत असताना हे रूग्णालय सुरू होत नसल्याच्या विषयाला सर्वप्रधम ‘सातारा अपडेट्स’ने वाचा फोडली होती. त्यामुळे काशिळच्या रखडलेल्या रूग्णालयाचा विषय ऐरणीवर आला होता. 

या उद्घाटन कार्यक्रमास गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या कोविड रुग्णालयात ३२ आयसीयु बेड व ३१ ऑक्सिजन बेड असणार आहेत. सुरुवातीला ३२ ऑक्सिजन बेड कार्यान्वित करण्यात येणार असून काही दिवसानंतर आयसीयु बेड कार्यान्वित करण्यात येणार आहे. 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या