Satara News : म्युकर मायकोसिसवर 'जनआरोग्य' अंतर्गत उपचार


म्युकर मायकोसिस उपचारासंदर्भात 104 टोलफ्रीवर संपर्काचे आवाहन

Satara News : म्युकर मायकोसिस संसर्ग असलेल्या रुग्णांवर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयाबरोबरच कराड येथील सह्यादी हॉस्पिटल व कृष्णा मेडिकल कॉलेज या रुग्णालयांमध्येही उपचार केले जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

या आजारासाठी उपरोक्त  हॉस्पिटलसाठी नोडल अधिकारी म्हणून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक देवीदास बागल (मो. नं. 9850415540) यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे सांगून, यासंदर्भात अधिक माहितीसाठी 104 या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. 

... तर आजार पूर्ण बरा होतो

म्युकर मायकोसिस संसर्ग असलेले रुग्ण सध्या जिल्ह्यामध्ये आढळत आहेत. वेळेत निदान व उपचार झाल्यास म्युकर मायकोसिस पूर्ण बरा होतो, असे त्यांनी सांगितले. म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळल्यास त्यांनी तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या