Satara News : कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी साधेपणाने


६२ व्या पुण्यतिथीदिनी कर्मवीरांच्या समाधीस्थळी पालकमंत्र्यांकडून अभिवादन

Satara News : सर्व जातिधर्माच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या भगिरथ प्रयत्नांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली करून देणारे महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक, शिक्षणप्रसारक, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६२ वी पुण्यतिथी सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात कोरोना विषाणूच्या पाश्र्वभूमीवर अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली.

यावेळी राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले.

याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, विठ्ठल शिवलकर, डॉ. प्रतिभा गायकवाड, शिवलिंग मेनकुदळे यांच्यासह रयत शिक्षण संस्थेतील पदाधिकारी उपस्थित होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या