Satara News : ब्लॅकमेल करत अत्याचार... वर दोन लाखांचा गंडा


शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; संशयिताला ठोकल्या बेड्या

Satara News : सातारा तालुक्यातील एका गावातील महिलेशी शारीरिक संबंध ठेवून त्याचे फोटो काढून ते महिलेचा पती, मुलगा, नातेवाईकांना दाखवण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केला. त्याच वेळी महिलेला दोन लाख रुपयांना गंडाही घातल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. स्वरूप महादेव गुजर (वय ५०, रा. हिरण्या प्राईड अपार्टमेंट, तामजाईनगर, सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

सन २०१८ ते २१ मे २०२१ या कालावधीत स्वरूप महादेव गुजर याने हा प्रकार केला आहे. पीडित महिलेशी शारीरिक संबंधाचे फोटो त्याने काढले. नंतर या कालावधीत सातत्याने हे फोटो तिचा पती, मुलगा, नातेवाईकांना दाखवण्याची धमकी देत वारंवार तिच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवले. संबंधास नकार दिल्यानंतर गुजर याने महिलेच्या गळ्याला चाकू लावून तिच्याकडून बँकेचा एटीएमचा पिन क्रमांक घेऊन तिच्या बँक खात्यातून १ लाख ५० हजार रुपये काढून घेतले व त्यानंतर आणखी असे २ लाख रुपये धमकी देवून काढून घेतले असल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. 

दरम्यान, याप्रकरणी स्वरूप गुजर याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक करण्यात आली असून तपास उपनिरीक्षक ए. बी. वाघमारे करत आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या