Satara News : कोयना धरण परिसराला भूकंपाचे सौम्य धक्के


केंंद्रबिंदू वारणा खोऱ्यात; कोयना, पाटणपासून अलोरे, चिपळूणपर्यंतचा परिसर थरारला
 

Satara News : कोयना धरण परिसरात शनिवारी दुपारी भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्यांची तीव्रता २.९  व ३.० इतकी नोंदविण्यात आली आहे. या भूकंपाचा कोणताही परिणाम कोयना धरणावर झाला नसल्याची माहिती धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली. तसेच पाटण तालुक्यात या भूकंपात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याचे तहसीलदार योगेश्वर टोम्पे यांनी सांगितले. 

शनिवारी दुपारी १ वाजून ५५ मिनिटांनी पहिला भूकंप झाला. तो २.९ रिश्टर स्केलचा होता. त्यानंतर लगेचच १ वाजून ५७ मिनिटांनी दुसरा ३.० रिश्टर स्केलचा भूकंप झाला. दोन्ही भूकंपांचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून १३.६ किलोमीटर वारणा खोऱ्यात जावळे गावच्या वायव्य दिशेला ८ किलोमीटर अंतरावर होता. केंद्रबिंदूची खोली सात किलोमीटर इतकी होती, असे कोयनानगर येथील भूकंप मापन केंद्रातून सांगण्यात आले. हे दोन्ही भूकंप कोयना, पाटण, पोफळी, अलोरे यासह चिपळूण, वारणा, जावली खोऱ्यात जाणवले. केंद्र


Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या