Satara News : जिल्ह्यात १९९० रूग्णांची भर; २६ बाधितांचा मृत्यू


आज फलटणची 'आकडेमोड' सुधारली म्हणायची, की तीही एक 'करामत' समजायची ?

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार १९९० नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून २६ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूध्द आठल्ये यांनी दिली.

प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या फलटण तालुक्यातील आठवडाभरातील आकडेवारीने बराच गोंधळ उडवून दिला होता. जिल्ह्याच्या बरोबरीने एकट्या तालुक्यातील आकडे येऊ लागल्याने तेथील जनता हबकून गेली होती. परंतु रोजचा डाटा व्यवस्थित न भरला गेल्यामुळे ही गफलत झाल्याचे समोर आले. कोरोनासारख्या गंभीर संकटाच्या काळात अशा चुका होत असतील तर तो संबंधित यंत्रणेचा हलगर्जीपणा नाही का ? या चुकीमुळे लोकांच्या मनोबलावर झालेल्या आघातास जबाबदार कोण व त्यांच्यावर काय कारवाई होणार असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज फलटणची ‘आकडेमोड’ सुधारली म्हणायची, की तीही एक ‘करामत’ समजायची असा सवाल केला जात आहे. 

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ७५ (७४४७), कराड २३१ (२२०५३), खंडाळा ८४ (१०२७८), खटाव २६२ (१५५८४), कोरेगाव २५० (१४१६३), माण २०९ (१११९६), महाबळेश्वर ३९ (४००८), पाटण १५८ (६७५०), फलटण २७१ (२५४९८), सातारा ३३६ (३४९५२), वाई ६२ (११४८९) व इतर १३ (१०४५) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ६४ हजार ४६३ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली २ (१६६), कराड ४ (६३५), खंडाळा ३ (१३४), खटाव ४ (४११), कोरेगाव १ (३१२), माण १ (२०८), महाबळेश्वर १ (४४), पाटण ० (१५७), फलटण ४ (२५०), सातारा ३ (१०२२), वाई ३ (३०३) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ३६४२ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या